testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

Last Modified सोमवार, 12 डिसेंबर 2016 (10:35 IST)
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरू केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरू करून, हा देह क्षणभंगुर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले.
दत्ताचा पहिला अवतार
'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार व 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच 'माणिकप्रभू' तिसरे व 'श्री स्वामी सर्मथ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे 'नेमिनाथ' म्हणून पाहतात आणि मुसलमान 'फकिरा'च्या वेशात पाहतात. दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्‍वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

राशिभविष्य