गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2016 (10:39 IST)

'श्री गुरुदेव दत्त' या नामजपाचे महत्त्व

पूर्वजांचा त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत. उदा. परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाल्यास पती-पत्नीचे न पटणे, पटल्यास स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसताना मूल न होणे, मूल झाल्यास मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यू, धंदा न चालणे, दारिद्रय़, शारीरिक आजार अशा समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिदिन 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप न्यूनतम (किमान) १0८ वेळा लिहावा. तसेच मोठय़ांना हा त्रास असल्यास रोज किमान एक घंटा तरी 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.