दिवाळी स्पेशल : खुसखुशीत शंकरपाळी
साहित्य : मैदा- 1/2 किलो, तेल - 400 ग्रॅम, साखर - 400 ग्रॅम, दूध - 3/4 वाटी.
कृती : सर्वप्रथम दूध, तेल या गोष्टी पातेल्यात घेऊन साखर वितळेपर्यंत गरम करावे. गरम झाल्यावर वरील मिश्रण एका परातीत ओतावे. त्यात मावेल तेवढा मैदा घालून घट्ट मळावे.
नंतर त्याची जाडसर पोळी लाटुन लहान लहान आकारात शंकरपाळ्या कापाव्यात आणि तुपात गुलाबी होईपर्यंत तळुन घ्याव्यात.