1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:06 IST)

घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी दिवाळीला या गोष्टी घरात आणा

दिवाळी हा सण आश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्येला साजरा केला जातो. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. दिवाळी हा हिंदूचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीचे प्रत्येकासाठी वेगळे महत्त्व आहे. हा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला जातो. या दिवशी घरात आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघतो. भारतात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.  
 
या दिवशी देवी लक्ष्मी , देवी सरस्वती आणि भगवान गणेशाची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. या काळात घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच दिवाळीला जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. साधारणपणे पूजेचे साहित्यही आधी विकत घेतले जाते.पण काही गोष्टी अशा असतात ज्या दिवाळीच्या दिवशीच खरेदी करणे शुभ असते. हे घरात आणल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
पूजेचे साहित्य -
दिवाळीला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. पूजेसाठी कुंकू, रोळी, चंदन, अबीर,गुलाल, नारळ, उदबत्ती, कापूर, शेंदूर, कलावा, हे साहित्य खरेदी करा. 
 
देवांचे चित्र- 
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी ,देवी सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि गणपती या देवांची तसवीर असलेले चित्र घरी आणावे. असं केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी नांदेल आणि पैशांची कमतरता भासणार नाही. आर्थिक अडचणी देखील दूर होतात. 
 
सोनं-चांदी खरेदी करणे शुभ -
या दिवशी किंवा दिवाळीत सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानले जाते. सोनं चांदी खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. प्रत्येकाला सोनं चांदी घेणं परवडत नाही. आपण सोन्या-चांदी ऐवजी पितळ्याची वस्तू विकत घेऊ शकता. 
 
मिठाई आणा-
या दिवशी दिवाळीसाठी लोक पूजेसाठी आधीच मिठाई खरेदी करतात. तसे करू नका. मिठाई आणि खाद्यपदार्थाची खरेदी त्याच दिवशी करावी. 
 








Edited by - Priya Dixit