शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:31 IST)

Diwali 2021: दिवाळीच्या रात्री हे मंत्र म्हणा आणि 5 जागी दिवा ठेवा, लक्ष्मीची कृपा राहील

Diwali 2021:  हिंदू धर्मात दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. यंदा 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन असून या दिवशी धूम धडाक्याने सण साजरा केला जाईल.
 
दिवाळीचा सण भगवान रामाच्या अयोध्येत आगमनाशीही जोडला जातो. या दिवशी लंकापती रावणाचा वध करून माता सीतेसह 14 वर्षांचा वनवास संपवून भगवान राम अयोध्येला परतले होते, असे मानले जाते. अयोध्येतील लोकांनी दीप प्रज्वलन करून रामाच्या पुनरागमनाचा आनंद साजरा केला. संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली, तेव्हापासून दिवाळीचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. या दिवशी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच याला दिव्यांचा सण असेही म्हणतात. दिवाळीच्या रात्री घर दिव्यांनी सजवले जाते.
 
दिवाळीचा सणही लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मीजींच्या उपासनेने जीवनात सुख-समृद्धी येते. दिवाळीच्या रात्री दिवा लावण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास शुभ फल प्राप्त होते. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून प्रकाश समृद्धी, ज्ञान आणि आनंदाचे प्रतीक आहे. दिवाळीच्या रात्री घरात दिवा लावताना या मंत्राचा अवश्य जप करा-
 
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते।।
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते।।
 
दिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी दिवे लावा
1- कर्जमुक्ती आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी दिवाळीच्या रात्री मंदिरात गाईच्या दुधाने तयार शुद्ध तुपाचा दिवा लावा.
2- दिवाळीच्या रात्री तुळशीजवळ दिवा ठेवावा. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
3- मुख्य दरवाजावर रांगोळीच्या मध्यभागी एक दिवा देखील ठेवावा. यामुळे सुख समृद्धी येते.
4- पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
5- मंदिरात दिवा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती मिळते.