1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (14:34 IST)

दसर्‍याला विडा का खातात, जाणून घ्या त्यामागील 4 कारण

Why We Eat Paan On Dussehra
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी काही परंपरा निभावल्या जातात, ज्यापैकी एक आहे हनुमानाला विडा अर्पित करणे.... विशेषकरुन सण मंगळवार किंवा रविवार या दिवशी पडत असेल तर याचं महत्तव अधिकच वाढतं.
 
कारण - विड्याला प्रेम आणि विजय याचे प्रतीक मानलं जातं. त्याच वेळी, बीडा या शब्दाचे देखील स्वतःचे विशेष महत्त्व आहे, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाशी निगडित राहण्याचे कर्तव्य म्हणून पाहिले जाते.
 
हेच कारण आहे की दसऱ्याला रावण दहन केल्यानंतर विडा खाल्ला जातो. दसऱ्याच्या दिवशी लोक असत्यावर सत्याचा विजयाचं आनंद विडा खाऊन साजरा करतात. पण विडा हनुमानाला रावणाच्या दहन करण्यापूर्वी अर्पण केला जातो, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
दसर्‍याला विडा खाण्यामागील एक कारण हे देखील आहे की या काळात वातावरणात परिवर्तन होत असतं, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. अशावेळी विडा आरोग्यासाठी चांगला ठरतो.
 
एक कारण असेही आहे की नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केल्याने पचनावर परिणाम होतो. अशावेळी पान खाल्ल्याने अन्न पचवणे सोपे होते.