गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

असे असावे स्नानगृह

WD
प्राचीन काळापासून संपत्तीचा संबंध पाण्याशी जोडला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संपत्तीचे वेगळेच महत्त्व असते. म्हणूनच 'काय पाण्यासारखा पैसा वाहवत आहेस? या म्हणीचा सर्रास वापर केला जातो. यात पैशाला नदीची उपमा दिली आहे. कारण पैसा हा पाण्याच्या प्रवाहासारखाच असतो.

फेंगशुईमध्ये देखील स्नानगृहाचा (ज्यात पाण्याचा प्रवाह सारखा सुरूच असतो.) संबंध घराच्या आर्थिक संपन्नतेशी जोडला जातो. स्नानगृहाचा दरवाजा जितका जास्त उघडा ठेवता येईल तितका जास्त उघडा ठेवावा. दरवाजाच्या मागे पाण्याचा नळ किंवा बेसिन असल्याने हा दरवाजा पूर्णपणे उघडत नसेल तर आत किंवा बाहेर 'ची' चा स्वतंत्र प्रवाह असणारा आरसा टांगावा.

सहसा घरात स्नानगृहासाठी अगदीच लहानशी जागा असते. पण फेंगशुईनुसार हे चुकीचे आहे. छोटे व अरूंद असे स्नानगृह निर्धनतेला आमंत्रण देते. व्यवस्थित, मोठे असलेले स्नानगृह वैभवाचे प्रतीक मानले जाते. स्नानगृहात स्नान करण्यासाठी टब व शॉवर असायला हवे. स्नानगृहातील टब आयताकार नको. गोलाकृती किंवा अंडाकृती हवे. कारण गोलाकृती टब नाण्यांचे प्रतीक मानले जाते. हा आकार चांगल्या वातावरणाची निर्मिती करतो.

स्नानगृहातील कपाटे व शेल्फ सामान्य असावीत. त्यांना नैसर्गिक रंग द्यावा. फेंगशुईनुसार स्नानगृह हे घराइतकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त प्रकाशमय असले पाहिजे. म्हणजे स्नान केल्यानंतर अधिक शक्ती, स्फूर्ती व उत्साह मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट खूप असतील किंवा त्याच्या धनाचा व्यवस्थित उपयोग होत नसेल तर स्नानगृह मोठे केल्याने परिस्थितीत फरक पडतो.