शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2016 (10:43 IST)

साला खडूस : न चुकवावा असा खेळ

‘साला खडूस’म्हणजे गोष्ट छोटी पण डोंगराएवढी आहे. तुमच्यातला स्पोर्टस्मन जिवंत असेल तर ‘साला खडूस’आवर्जून बघा साधा सरळ अगदी एखाद्या चेन्नईच्या छोटय़ा गावातली मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावरची बॉक्सर बनते त्याचा हा प्रवास आहे. आपल्याला प्रोमोवरून त्याची चुणूक मिळते तसा काहीसा. खडूस, तिरसट माथेफिरू प्रशिक्षकाची गोष्ट आहे अन् त्याने एका गावातल्या मासळी विकणार्‍या मुलीला बॉक्सर बनवण्याचा विडा उचलला आहे मग ही गोष्ट माहीत असूनही आपण सिनेमा पाहताना खुर्चीला खिळून राहतो. ही या साध्या गोष्टीतली गंमत आहे. आर माधवनचा केस वाढलेला, दाढी वाढलेला लूक अन् त्यामध्ये रितिका सिंग नावाची मुलगी या सिनेमात काय गंमत असणार कारण स्पोर्टस् बेस्ड फिल्म्स या आपल्याला हरण्यातून जिंकण्याचा प्रवास अधोरेखित करणार्‍या आहेत. मग ती अव्वल नंबर, लगान, गोल, मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, इक्बाल, चक दे असो, ब्रदर्स असो वा ङ्खरारी की सवारी त्यामध्ये आपल्याला कायम हरण्यातून जिंकण्याचा प्रवास दाखवणारा, आशेचा किरण देणार्‍या आशा असतात. पण ‘साला खडूस’अधोरेखित करतं एक नातं प्रशिक्षक अन् खेळाडूचं, एकमेकांच्या स्पर्धक बनलेल्या बहिणी-बहिणींचं अन् त्यामधल्या स्पोर्टस्मन स्पीरिटचं. जगण्याकडे बघण्याचा एक नवा अँटिटय़ूड देणारा असा हा सिनेमा आहे.