गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (21:09 IST)

National Best Friends Day 2020 : मित्रांना तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व सांगा...

आपल्या मित्रांना सांगा की तुमच्या आयुष्यात त्यांचे काय महत्त्व आहे. जे तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचे आहे. ते तुमच्या आयुष्याची अनमोल भेट आहे मैत्री, जी आपल्याला जगणं शिकवते...
 
मित्रांसह आनंदाच्या रात्री सरतात, उत्सव साजरे केले जातात, सुख दुःखाचे क्षण सामायिक केले जातात. मैत्री जीवनातील अनमोल भेट आहे. जी जीवन जगायला शिकवते. अली कडील जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाउन सुरूच आहे. या दरम्यान घरात राहून एकाकीपणामुळे मित्रांची फार आठवण येत असते. 
 
अश्या परिस्थितीत ज्या मित्रांशिवाय संध्याकाळ कंटाळवाणी आणि लांब असायची, आता त्यांचा शिवाय बराच काळ सरला आहे त्यामुळे त्यांची फार आठवण येते. ते क्षण आठवले ज्या क्षणात आम्ही सोबतीने चहा घेत होता, आणि फार धिंगाणा करत होता. सोबतीने केलेला मेट्रोचा प्रवास देखील आठवतो. गप्पा करत करत प्रवास कधी संपायचा कळतच नव्हते. बघता बघता वेळ कसा सरत गेला कळलेच नाही.
 
आता जरी सर्वांजवळ मोबाईल फोन आहे आणि सोशल साईट्सचेही बरेच पर्याय आहेत. पण तरी ही अश्या परिस्थितीत आपल्या काही गोष्टी मित्रांना सामायिक करण्याची संधीच मिळाली नाही. हे त्यांना सांगण्याची संधीच मिळाली नाही की या काळात आम्हाला त्यांची किती आठवण आली. आम्ही हे सांगू शकलो नाही की ते आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि आमच्या जीवनात त्यांचा किती मौल्याचा वाटा आहे आणि आमच्या जीवनात त्यांचे काय महत्त्व आहे.
 
यंदा राष्ट्रीय बेस्ट फ़्रेंड्स डे(National Best Friends Day) ने आपल्याला ही संधी दिली आहे की आम्ही आपल्या मित्रांना हे सांगू शकतो की त्यांच्याशिवाय हा काळ किती कंटाळवाणी गेला. त्यामुळे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांना हे सांगा की मित्रांच्या विनोदाने एकाकीपणाच्या कंटाळवाण्या वातावरणात बऱ्याचवेळा हसवलं आहे. आयुष्याचे काही महत्त्वपूर्ण क्षण त्यांचा सह सामायिक करा आणि सांगा ..
 
आपणच ते मित्र आहात ज्यांचा सहवासात मी आयुष्यातील सर्वात जास्त चांगला काळ जगला आहे. ज्यांच्यासह मी माझे प्रत्येक क्षण आनंदात जगलो आहो.
 
आपल्या मित्रांना सांगा की या मैत्री दिवसाचे महत्त्व त्यांच्यामुळेच आहे. ते एक मित्राच्या रूपात असे मित्र आहे ज्यांच्याशी रक्ताचं नातं नसलं तरी ही ते हृदयाचा जवळचे आहेत.
 
मी देवाचे आभार मानतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो की मला माझ्या दुःखात आपल्या सारख्या मित्रांची साथ मिळाली. आपला खांदा मिळाला. दुःखाच्या क्षणात देखील आपल्या विनोदाने मला हसणं शिकवलं आणि हसवले. माझ्या दुःखांना शेअर करणं आणि त्यांना दूर करण्यासाठी आपली फार आठवण आली.
 
मित्र ते आहे जे कुटुंब जरी नाही पण त्यांची आपल्या आयुष्यात एक महत्त्वाची आणि विशेष जागा असते आणि त्यांचा शिवाय कुटुंब देखील संपूर्ण होत नाही.
 
मित्रांनो! आपण कठीण काळाला देखील सोपं केलं आणि चांगल्या वेळेचे साथीदार बनला.