शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

मैत्रीचा प्रवास फुलण्यासाठी ..

मैत्री म्हणजे नवं नातं. नातं असं असतं की ते जपण्यासाठी आपण जीवाचीही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात तडजोड करावी लागते. पण ते खरंच टिकवायचं असेल तर. तर काही नियम आपल्या मनाशी घट्ट बाळगा आणि मग पाहा आपला मैत्रीचा प्रवास कसा फुलतो ते...
* मैत्री करताना कोणतेही भेदभाव पाळू नका.

* आपल्या मित्र-मैत्रिणींना कधीही त्यांची जात विचारू नका.

* मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस कधी विसरू नका.

* मैत्री करताना कोणतीही अट आपल्या मित्राला घालू नका.

* काही प्रसंगी तुम्ही मित्रासाठी काही तडजोड करत असाल तर, त्याच्या फुशारक्या चारचौघात किंवा कट्टय़ावर मारू नका.

* मित्रावर दडपण येईल असे कोणतेही काम त्याला सांगू नका.

* मैत्रीत व्यवहार नसलेलाच बरा. आणि असा कधी व्यवहार करण्याची वेळच जर तुमच्यावर आली तर तो व्यवहार तंतोतंत पाळा.

* तुमची मैत्री एखाद्या मुलीशी झाली असेल तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. (मुलींसाठीही हाच नियम महत्त्वाचा आहे)

* मित्रांकडून अवाजवी अपेक्षा करू नका.

* मित्राच्या भिडेखातर कोणतेही व्यसन स्वत:ला लागू देऊ नका. त्याने आग्रह केला तरी त्याला विनंती करून त्याचा आग्रह टाळा.

* आपल्या मित्र-मैत्रिणींना कमी लेखू नका.