शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By वेबदुनिया|

व्यक्तिची ओळख: खरा मित्र

कौटुंबिक नात्याच्या बरोबरीने मैत्रीच्या नात्यालाही महत्वपूर्ण स्थान आहे. आपण आपल्या स्वभावावर मित्र बनवतो. भविष्यात व्यक्तिचे मित्रच त्याची ओळख असतात.

छोट्या चिमुरड्यांपासून तर वयोवृध्दांपर्यंत मैत्री होऊ शकते. मैत्रीला वयाचे बंधन नसते. व्यक्‍ती बोलका असता तर तास भराच्या प्रवासातच मैत्री करून घेतो. त्यामुळे मैत्रीला स्थळ, वेळ, वय व महत्वाचे म्हणजे लिंग यांचे काहीच बंधन नाही. शाळेत मुले-मुली एकत्र खेळतात. तर महाविद्यालयीन जीवनात ते एकमेकांचे जीवलग मित्र होतात. तर करा या फ्रेंडफिप डेला नवीन मित्र.
नवीन मि‍त्र बनवण्याचे फंडे

WD

नवीन मि‍त्र बनवण्याचे फंडे


1. मुलगा असो वा मुलगी मैत्री करायला घाबरायचे नाही.
2. चेहर्‍यावर हास्य करत पाऊल उचला व परिचय करून देताना तुमच्या मित्राचाही परिचय करून घ्या.
3. नवीन मित्राशी संवाद साधत असताना त्याच्या परिस्थितीची किंवा त्याच्या व्यंगाची टिंगल उडवू नका. तसेच तुमचा मित्र गरीब घरचा असेल तर त्याच्या समोर पैशांचा आव आणू नका.
4. मित्रावर केवळ तुमच्या गोष्टींचाच भाडीमार करू नका, त्याच्या गोष्टीही ऐकण्यात रस घ्या.
5. नवीन मित्रांच्या आवडी-निवडी लक्षात घ्या व त्यालाही तुमच्या आवडी-निवडी सांगा त्यांच्यात साम्य असेल तर 'नो प्रॉब्लेम'
6. मैत्रीचे नाते हे खुप सुंदर असते. त्याच्यात अविश्वास निर्माण झाला तर मैत्री काही दिवसातच तुटते व त्याच्यात दोघांचे नुकसान होते.
7. खरा मित्र असा असतो की, केवळ आपल्या सुखातच सहभागी न होता त्याने आपल्या दुःखातही सहभाग घेतला पाहिजे.
8. मैत्रीमध्ये जास्त करून पैशावरून वाद होतात, त्यामुळे मैत्रीत पैसा जरा दुरच ठेवायला पाहिजे. मैत्रीला पैशाची लागण झाल्यास मैत्रीची बहरणारी सुहासीत वेल क्षणात उन्मळून पडते.