सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (12:36 IST)

गणेशोत्सव 2020 : गणपतीचे आवडीचे पदार्थ, विशेष नैवेद्य अर्पित करा

गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाच्या वेळी श्री गणेशाची 10 दिवस स्थापना करून त्यांची पूजा उपासना केली जाते. काही राज्यात हा गणेशोत्सव तीन दिवसीय असतो नंतर विसर्जन केले जाते. 10 दिवस अर्थात अनंत चतुर्दशी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात काही भागात शेवटी मिरवणूक काढली जाते. 10 दिनी या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य अर्पण केले जाऊ शकतात.
 
1 मोदकाचे लाडू : गणपतीला मोदकाचे लाडू किंवा मोदक फार आवडतात. मोदक देखील अनेक प्रकाराचे बनतात. महाराष्ट्रात विशेषतः गणेशपूजनाच्या निमित्ताने घरा-घरात वेगवेगळे प्रकाराचे मोदक बनवतात. 
 
2 मोतीचुराचे लाडू : गणपतीला मोदका नंतर मोतीचुराच्या लाडवाचा नैवेद्य असतो. यालाच बुंदीचे लाडू असे ही म्हणतात. या व्यतिरिक्त त्यांना साजूक तुपाने बनलेले हरभऱ्या पिठाचे (बेसनाचे) लाडू देखील आवडतात. तीळ आणि रव्याचे लाडू देखील त्यांना नैवेद्यात दिले जातात. 
 
3 नारळी भात : हे दक्षिण भारतात बनविला जातो. नारळाच्या दुधात किंवा पाण्यात तांदूळ भिजवून ठेवतात नारळाचे गीर तांदुळात मिसळून शिजवून भात करतात.
 
4 साटोरी किंवा पुरणपोळी : हा एक खवा किंवा मावा, तूप, हरभऱ्या डाळीचे पीठ(बेसन) आणि दुधापासून बनविला जाणारे खास महाराष्ट्रीयन व्यंजन आहे. साटोरी पोळीप्रमाणे वर्तुळाकार किंवा गोल असते. तसेच चण्याची डाळ आणि गूळ मिसळून पुरणपोळीचा थाट काही वेगळाच आहे.
 
5 श्रीखंड : केशर मिश्रित पिवळे श्रीखंड नैवेद्यात ठेवले जाते. दह्यापासून बनलेल्या या गोड पदार्थात बेदाणे आणि चारोळी मिसळून नैवेद्य दाखवावे. श्रीखंडच्या व्यतिरिक्त आपण पंचामृत किंवा पंजिरी देखील नैवेद्यात देउ शकता.
 
6 केळ्याचा शिरा : मॅश केलेले केळे, रवा आणि साखरेपासून बनवलेला शिरा रव्याच्या शिरा प्रमाणेच असतो. हे देखील गणपतीला प्रिय असल्याचे मानले गेले आहे. त्यांना केळ्याचा नेवेद्य देखील आवडीचा आहे. 
 
7 रवा पोंगळ : याला रवा म्हणजेच सुजी आणि मुगाच्या डाळीच्या पिठा बरोबर तूप टाकून बनवतात. यामध्ये बेदाणे, काजू आणि बदाम टाकले जाते. याला आपण मुगाचा शिरा देखील म्हणू शकता. या शिवाय आपल्याला इच्छा असल्यास रवाचा शिरा देखील नैवेद्यात ठेऊ शकता.
 
8 पयसम : ही देखील एक पारंपरिक दक्षिण भारतीय खीर आहे. ही दूध आणि साखर किंवा गूळ घालून बनवतात आणि यामध्ये तांदूळ किंवा शेवया मिसळून बनवतात. सजविण्यासाठी वेलची पूड, साजूक तूप आणि इतर सुखे मेवे घालून सजवतात. आपली इच्छा असल्यास तांदूळ किंवा साबुदाण्याची खीर देखील बनवू शकता.
 
9 साजूक तूप आणि गूळ : साजूक तूप आणि गूळ मिसळून त्याचा नैवेद्य दाखवतात. या शिवाय आपली इच्छा असल्यास श्री गणेशाला चतुर्थीच्या दिवशी खारीक, मुरमुरे, नारळ आणि खडीसाखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता.
 
10 शमीची पाने आणि दुर्वांकुर : गणपतीला नैवेद्यात शमीची पाने आणि दुर्वा देतात. त्यांना 21 गुळाच्या ढेपांसह दुर्वा दिल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. शमी देखील गणपतीला फार आवडते. शमीची पाने नियमाने गणेशाला दिल्याने घरात धन आणि सुख वाढते.

आपल्या आयुष्यात फार कष्ट आणि समस्या असल्यास गणेश चतुर्थीला हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा.