शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (12:26 IST)

सुखकर्ता दु:खहर्ता आरती दररोज किमान १५ कोटी वेळा म्हटली जाते, जाणून घ्या अर्थ

जागतिक आकडेवारीनुसार जगात सर्वात जास्त गायलेले गीत म्हणजे आपले अतिशय आवडते मराठमोळे समर्थ रामदास  स्वामी रचित सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती होय!
 
ही आरती दररोज किमान १५ कोटी वेळा म्हटली जाते! हिंदू धर्माचा कट्टर विरोधक, धर्म द्वेष्टा कपटी अफझल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी अंत केला तेव्हा देवकार्याबरोबरच राष्ट्रकार्याचा ध्यास घेतलेल्या समर्थ रामदास स्वामींना अत्यानंद झाला. आपल्या स्वप्नातले आनंदवन भुवन असे हिंदू राष्ट्र उभारणारा दैदीप्यमान महात्मा या मातीत जन्माला आला याचे निरातिशय अप्रूप समर्थ रामदास स्वामींना वाटले. समर्थ रामदास स्वामींनी देवाचे मनोमन आभार व्यक्त केले. सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाल्याने सृष्टीचा निर्माता ओंकारस्वरूप गणेशाचे गुणगान करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी ही आरती समर्थांनी अष्टविनायकांपैकी पहिल्या मोरगावच्या मयुरेश्वरासमोर रचली!
 
मंडळी, यावर तथाकथित पुरोगामी किंवा ब्रिगेडी किंवा नास्तिक विश्वास ठेवणार नाहीत. पण मंडळी कोणी नोंद घेवो ना घेवो, गिनीज विक्रम पुस्तकातील इतर सर्व विक्रमांना फिकं पाडणारा हा आम्हा मराठी बंधुभगिनींना हिंदूंच्या, मराठी माणसाच्या अभिमानाचा निर्विवाद जागतिक विक्रम वाटतो! चला तर, या गणपती उत्सवाच्या दिवसात संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या आरतीचा अर्थ समजून घेऊया. आपण घरातील लहानग्यांना हा नीट समजावून सांगा ही विनंती. मंडळी इतर धर्मीय लहान मुलांना लहानपणापासून त्यांच्या धर्माच्या  शिकवण्या देतात मग आपण  एवढे करनकरी का आहोत? का आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान नाही? 
 
सुखकर्ता दु:खहर्ता म्हणजे:- (सुख देणारा दुःख हरण करणारा), 
नुरवी म्हणजे:- दुःखाचा समुळ नाश करतो. 
पुरवी प्रेम कृपा जयाची. म्हणजे:- त्याची कृपा झाली की प्रेमवर्षावा भक्ताला लाभ होतो.
सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची।। म्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे। 
कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।। म्हणजे:- त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे।।१।। 
 
जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मन: कामना पुरती।।धृ।। म्हणजे:- हे देवा, तुझा जयजयकार असो! तू मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस। तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात।।धृ।।
 
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे। 
चंदनाची उटी कुंकुमकेशरा। म्हणजे:- कुंकू व केशरमिश्रित चंदनाची उटी तू लावली आहे। 
हिरेजडित मुकुट शोभतो बरा। म्हणजे:-हिर्‍यांनी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे. 
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।। म्हणजे:- तुझ्या पायांतील वाळ्यांतील घुंगरांचा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।
 
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना। म्हणजे:- मोठे पोट असणारा, पीतांबर नेसलेला, कमरेला नागाचे बंधन (कडगोरा) असलेला.
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना। म्हणजे:- सरळ सोंड व वक्र तोंड असणारा, म्हणजेच वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणाऱ्या व बोलणार्‍यांना हल्लीच्या वाकड्या तोंडाच्या हिंदूंवर काळा डाग असणाऱ्या नास्तिकाला शिक्षा करून त्यांना सरळ मार्गावर आणणारा त्रिनयना (३ नेत्र असणारा).
दास रामाचा वाट पाहे सदना। म्हणजे:- हे गणपती! मी रामाचा दास ( समर्थ रामदास स्वामी) माझ्या घरी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३।। म्हणजे:- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवांकडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तू मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर निर्वाणी - अखेरीच्या क्षणी, देहत्यागाच्या वेळी तू माझे रक्षण कर ही तुझ्याचरणी नम्र प्रार्थना
 
रचयिते महान संत: हिंदू राष्ट्राची आस लागून राहिलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी.
 
- सोशल मीडिया