मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: पुणे , शनिवार, 19 एप्रिल 2014 (12:20 IST)

'माझा आवाज काढून बदनामीचा प्रयत्न'

'माझी बहीण सुप्रिया सुळे यांना मतदान करा, अन्यथा गावचे पाणीच तोडू, अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी झालेल्या मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामतीच्या मतदारांना दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र, अजित पवार यांनी मासाळवाडीच्या गावकर्‍यांना  अशाप्रकारची कोणतीही धमकी दिली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. माझा आवाज काढून बदनामीचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी स्वत:चा बचाव करताना म्हटले आहे.

ऐन निवडणुकीत अजित पवारांचे कथित धमकी प्रकरणी राजकारण तापले आहे. विरोधकांनी केलेले आरोप खोटे आहेत. आपल्यावर चुकीचे आरोप केल्याप्रकरणी 'आप'चे उमेदवार सुरेश खोपडे यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.  
दरम्यान, सुप्रिया सुळेंना मतदान करा नाहीतर पाण्याला मुकाल; अजित पवारांची धमकी मासाळवाडी गावातील एका सभेत अशाप्रकारच्या धमकीचा एक व्हिडिओ उपलब्ध असल्याचे बारामती मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी वडगाव पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवताना म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याबाबत तक्रार दाखल करून घेतलेली नाही. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले म्हणाले.

या अंधुक व्हिडिओमध्ये अजित पवार यांचा चेहरा स्पष्‍ट दिसत नसला तरी आवाज मात्र त्यांचाच आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मतदारांना शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला होता. आयोगाने पवारांना याप्रकरणी तंबीही दिली होती. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या दादागिरीचे प्रकरण उघडकीस आले आहे.