शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: नमाड , सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:17 IST)

घरातले वाद घरात मिटवा- अजित पवार

'घरातले वाद घरात मिटवा, तुमच्या तेलकट वडे आणि चिकन-सुपने देशाचे प्रश्न सुटणार नाहीत', असा खोचक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. पुतण्या सांभाळता आला नाही त्याला आम्ही काय करणार? असे टोलाही लगावला आहे. पवार दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारासाठी ते नांदगाव इथे आले होते.

पवार म्हणाले, बारामतीतील जनतेचे पाणी तोडून त्यांचा विश्वासघात कसा करेल. बारामतीकर मला भरघोस मतांनी निवडून देतात. मग मी त्यांचे पाणी तोडण्याची भाषा कशी वापरेल. विरोधकरांनी माझ्या आवाजाची बनावट ऑडिओ क्लिप सादर करून माझी बदनामी करण्याचे षडयंत्र केल्याची आरोप पवारांनी केला.

दरम्यान, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी येवला येथील सभेत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. अजित पवार पैसे खातात, असा आरोप केला होता.