शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:24 IST)

गोवा विधानसभा निवडणूक, शिवसेना दहा ते बारा जागांवर लढणार

गोव्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना दहा ते बारा जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गोव्याच्या राजकारणात शिवसेना नवीन पक्ष नाहीये. जरी निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपयश मिळत असलं तरी शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणूका २०१७ साली लढवल्या होत्या. परंतु यावेळी गोव्यातील राजकीय वातावरण गोव्यातील जनतेसाठी काही आशादायी दिसत नाहीये. 
 
अनेक राजकीय पक्ष नव्याने उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षातून निवडणुका लढतयं. हे सुद्धा स्पष्ट होत नाही. हिंदी भाषेमध्ये आयराम-गयाराम हा शब्द प्रचलित आहे. त्याप्रमाणे गोव्यामध्ये आले माऊ- गेले माऊ हा शब्द राजकीय प्रचारात प्रचलित आहे. कारण कधी कोण गेले आणि कधी कोण जाईल याचा काहीही भरोसा नाहीये. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढत आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, गोव्यातून शिवसेना दहा ते बारा जागा लढणार आहे. आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. पेडणे, माफसा, शिवली, हळदोणे, पणजी, परये, वाळपयी, वास्को आणि केपे अशा नऊ जागांवर शिवसेना निवडणुक लढणार आहे. ही पहिली यादी असून उद्यापर्यंत आम्ही उरलेल्या तीन मतदार संघाची घोषणा करणार आहोत. यावेळेस शिवसेना या निवडणुकीमध्ये गांभीर्याने आणि ताकदीने लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे उमेदवार असे 
पेडणे- सुभाष केरकर
माफसा- जितेश कामत
शिवली- भीमसेन परेरा
हळदोणे- गोविंद गोवेकर
पणजी – शैलेंद्र वेलिंगकर
परये- गुरुदास गावकर
वास्को- मारुती शिरगावकर
केपे- अॅलेक्सी फर्नांडिस