शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्याला पूर्वजांचे पूजन करण्याचे महत्त्व आहे.
 
पितृदोष शांतीसाठी- 
 
* अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.

* अमावस्याला पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि पुष्प अर्पित करावे.

* मंत्र - 'ॐ पितृभ्य: नम:' चा जप करावा.

* पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र चा पाठ करावा.
 
* पितृ दोष दूर करण्यासाठी ब्राह्मणांना आपल्या सामर्थ्यानुसार पूर्वजांची आवडती मिठाई व दक्षिणेसह भोजन करवावे.
* अमावस्याला तांब्याच्या भांड्यात लाल चंदन, गंगा जल आणि शुद्ध जल मिसळून 'ॐ पितृभ्य: नम:' मंत्राचा जप करत सूर्य देवाला तीनदा अर्घ्य द्यावे.