रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (17:45 IST)

काळे कपडे घालू नका या अष्टमीला, मुलांच्या यशासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते हे व्रत

Ahoi Ashtami Vrat 2023 संततीसाठी अहोई अष्टमी व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. आपल्या मुलांच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी आई या दिवशी कठोर निर्जला व्रत आणि विधीनुसार पूजा करते, परंतु या दिवशी काही गोष्टी न करण्याचा सल्ला शास्त्रांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया अहोई अष्टमीला काय करू नये.
 
अहोई अष्टमी 2023 व्रत कधी आहे ?
यंदा अहोई अष्टमी व्रत यंदा 5 नोव्हेंबर 2023 रविवारी ठेवण्यात येत आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या संततीसाठी व्रत करतात.
 
अहोई अष्टमी व्रताचे महत्त्व
अहोई अष्टमी व्रत संततीच्या प्रगती आणि यशासाठी ठेवलं जातं. या दिवशी देवी अहोई ची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि निर्जला व्रत ठेवलं जातं. अहोई देवी मुलांचे आरोग्य, आनंद आणि समृद्धीचे रक्षण करते, त्यांची वाढ आणि विकास सुनिश्चित करते असे मानले जाते. त्यामुळे अहोई अष्टमीच्या व्रताला खूप महत्त्व आहे.
 
अहोई अष्टमीच्या दिवशी काय करु नये?
टोकदार वस्तू वापरु नये
अहोई अष्टमीच्या दिवशी टोकदार वस्तू जसे सुई, खीळ, कात्री या वस्तू वापरु नये. असे केल्याने शुभ फळ प्राप्ती होत नसते.
 
तांब्याचा लोटा वापरु नये
या दिवशी रात्री तार्‍यांना अर्घ्य देण्यासाठी तांब्या वापरु नये.
 
भांडणापासून दूर राहा
अहोई अष्टमीच्या दिवशी कोणाशीही भांडणे टाळा. तसेच मोठ्याचा अपमान करू नका. असे केल्याने देवाचा राग येऊ शकतो.
 
काळे कपडे घालू नका
अहोई अष्टमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी काळे, निळे आणि गडद रंगाचे कपडे घालू नयेत.