शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (14:56 IST)

धर्म विज्ञानावर वर आधारित ; पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

अध्यात्म आणि सायन्स
 
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. 
 
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
 
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो. 
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पॉइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
 
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये रिसीव्हिंग मोड मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल, तेव्हा पुढचे नियम त्याकरीता- 
 
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे. 
ह्यामागेही दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
 
3) आपले पाच सेंस म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस उद्दीपित करतात.
कापूर जाळणे -- दृष्टी
कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे- स्पर्श
मुर्तीवर फुले वाहणे- फुलांच्या अरोमामुळे वास.
कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे- चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
घंटानाद व मंत्रोच्चरण-  ऐकणे.
 
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसीव्हिंग मोडमध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते. मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजब जाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, सेटल व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. 

आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा. धर्म विज्ञानावर वर आधारित आहे.
- सोशल मीडिया