गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (09:18 IST)

उपवास करण्याचे 3 मुख्य उद्दिष्टे आणि नियम

उपवास करण्याचे काही नियम आहेत जे आपल्याला हिंदू धर्माचीच देणगी आहे. हिंदू धर्मात उपवास करण्याचे बरेच नियम आहेत आणि त्यांचे महत्त्व देखील आहेत. उपवास करणं एक पवित्र कार्य आहे. आणि ह्याला नियमानं न केल्यानं ह्याचे महत्त्व देखील राहत नाही आणि लाभ तर मिळतच नाही उलट ह्याचा मुळे नुकसान देखील होऊ शकतात. जर आपण उपवास धरत नसल्यास तरीही आपल्याला या कर्माची किंमत मोजावी लागणार. अखेर उपवास करणं का महत्त्वाचं आहे? तीन प्रामुख्य उद्दिष्टे जाणून घ्या
 
1 उपवास करण्याचे पहिले उद्दिष्टे :
उपवास केल्यानं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ताप कमी होतंच तसेच ग्रह-नक्षत्रांच्या दुष्प्रभावा पासून वाचता येऊ शकतं. तथापि उपवास करण्याचे मुख्य उद्दिष्ट संकल्पाला विकसित करणे आहेत. सकारात्मकता, चिकाटी आणि एकनिष्ठतेचा गुण संकल्पवान च्या मनात असतो. संकल्पवान व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. ज्या माणसाच्या मनात वचन आणि कर्मासाठीचे दृढ संकल्प नसतात तो मृत मानला जातो. दृढनिश्चयी नसलेल्या माणसाच्या गोष्टींवर, आश्वासनांवर, रागाच्या भावनांवर आणि त्याचा प्रेमावर कधीही विश्वास ठेवू नये. 
 
2 उपवास करण्याचे दुसरे उद्दिष्टे : 
लोकं कोणत्याही क्षणी आप-आपल्या विश्वास आणि श्रद्धेनुसार वेग-वेगळ्या देवी आणि देवांना मानतात आणि त्यांची पूजा करतात. याच अनुक्रमने ते आठवड्यातून एके दिवशी किंवा एखाद्या विशेष प्रसंगी आपल्या देवी आणि देवांसाठी उपवास करतात. या दिवशी ते संपूर्ण दिवस अन्न न घेता फळे घेतात. असं केल्यानं देवी आणि देव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व त्रासाला आणि अडचणींना दूर करून सर्व इच्छा पूर्ण करतात. अशी धर्माची मान्यता आहे.
 
3 उपवास करण्याचे तिसरे उद्दिष्टे :
या उपवासात माणूस आपल्या आध्यात्मिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी शरीरास शुद्ध करतं. हे उपवास खूप कठीण असतात. या मध्ये माणूस अन्न- पाण्यांचा त्याग करतो. या अंतर्गत क्रिया योग देखील करतात. जर आपले उद्दिष्टे आध्यात्मिकता साध्य करण्याचे नसून आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीचेच असल्यास हे उपवास करणं आपल्यासाठी फायदेशीर असत. बरेचशे लोकं आपले वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाचा घेर वाढू नये या साठी उपवास करतात. जर आपण उपवासच धरणार नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
 
वास्तविक आपण लहान पणापासूनच जेवत आहोत म्हणजे आपल्या आतड्यांसह आपले शरीराचे अवयव सतत आपल्या अन्नाला पचविण्याचे कार्य करतात. अश्या परिस्थितीतही त्यांनी एकही दिवस विश्रांती घेतली नाही किंवा सुट्टी देखील घेतली नाही. आपली इच्छा अशी तर नाही की ह्या अवयवांनी कायम स्वरुपी विश्रांती करावी. नाही नं ? तर आपल्या पोटाला एक दिवस तरी विश्रांती द्यावी. 
 
उपवास केल्यानं आपले शरीरास स्वच्छ होण्यास वेळ मिळतो. काय आपण आपल्या बाइकला किंवा कारला वर्षभर त्याची काहीही काळजी न घेता चालवू शकता का? नाही न, मग त्याच प्रमाणे आपल्या शरीरास देखील पुरेश्या विश्रांतीची गरज असते. म्हणून किमान एक दिवस तरी शरीराच्या अवयवांना सुट्टी द्यावी.