शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (09:36 IST)

सकाळच्या वेळी पोथी वाचण्याचे वैज्ञानिक कारण जाणून घ्या

religious content
प्रत्येक धर्मात धर्मग्रंथाचे खूप महत्त्व आहे, आणि पावित्र्य आणि आदराच्या दृष्टिकोनाने त्यांना वाचण्याची वेळ आणि पद्धत तेवढीच महत्त्वाची असते. पण धर्मग्रंथानं वाचण्याची वेळ सकाळ आणि संध्याकाळची योग्य मानलेली आहे. चला जाणून घेऊया या मागील वैज्ञानिक कारण - 
 
हिंदू धर्मामध्ये बरेच धर्म ग्रंथ आहे, ज्यांचे वाचन केल्यामुळे धर्माविषयी माहिती तर मिळतेच त्याच बरोबर मार्गदर्शन देखील मिळतं. पण यापैकी बरेचशे धर्मग्रंथ सकाळ किंवा संध्याकाळीच वाचतात.
 
बरेचशे लोक आपल्या दिवसाच्या सुरुवातीस धर्मग्रन्थ वाचणे शुभ मानतात, तर काही लोक संध्याकाळी याचे वाचन करतात. धर्मग्रन्थ सकाळ किंवा संध्याकाळी वाचण्याच्या मागे धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणाशिवाय वैज्ञानिक कारण देखील आहे. 
 
खरं तर सकाळची वेळ आपल्या मन, मेंदू आणि शरीरासाठी फायदेशीर असते. ही वेळ सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते ज्यामुळे या वेळेस आपल्या मेंदूची कार्यक्षमता आणि ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. आणि हीच ती वेळ असते ज्यावेळी आपल्या मेंदूवर कोणत्याही प्रकाराचा दाब नसतो, आणि वाचलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचा मनावर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. 
 
म्हणूनच धर्मग्रंथांना विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वाचतात. जेणे करून आपल्या आरोग्यावर आणि वागणुकीवर त्यांचा सकारात्मक परिणाम होवो.