गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (17:24 IST)

आध्यात्मिक भोजन कसे करावे

* आपण जे भोजन करतो, ते आपणव स्वतः ग्रहण करत नाही. ते आपल्या देहात स्थित असलेल्या परमात्म्याला अर्पण करतो. त्यामुळे समस्त सृष्टि तृप्त होती.
* भोजन मंत्र बोलून परमात्म्यास अर्पण करुन मगच भोजन करावे.
* देहाचे दोन हात, दोन पाय आणि मुख ही पाच अंगे धुवूनच मग भोजन करावे.
* हातपाय धुतल्याने आयुष्य वाढते. चांगले आरोग्य लाभते.
* सकाळी आणि सायंकाळी भोजन करण्याचा नियम आहे.
* पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करुन भोजन करावे.
* दक्षिण दिशेला मुख करुन भोजन केल्यास ते भोजन प्रेतास प्राप्त होते.
* पश्चिम दिशेला मुख करुन भोजन केल्यास त्यामुळे रोगाची वृद्धि होते.
* शैय्या, अंथरूण, बेडवर, हाथावर, जुने पुराने ताट भांडयामध्ये भोजन करु नये.
* कलह, भांडणाच्या वातावरणात, पिंपळाच्या, वडाच्या झाडाखाली भोजन करु नये, तसेच लघवीला जोरात आली असेल तर भोजन करु नये.
* वाढलेल्या भोजनाची कधीही निंदा करु नका, भोजना करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेची स्तुति करा व सर्व उपाशी लोकांना भोजन प्राप्त होवो अशी देवाकडे प्रार्थना करा व मग भोजन करा.
* स्वैयपाक तयार करणाऱ्यांनी अगोदर स्नान करावे व शुध्द मनाने, नामस्मरण करत भोजन बनवावे आणि सर्वात पहिल्यांदा तीन पोळ्या बाजूला काढाव्यात.
१. गायीला २. कुत्र्याला ३. कावळ्याला नैवेद्य ठेवून मग घरातील देवास व अग्निदेवास नैवेद्य दाखवून घरातील सर्वानी भोजन करावे.
* इर्ष्या, भय, क्रोध, लोभ, रोग, दीन भाव, द्वेष भावाने केलेले भोजन कधी पचत नाही. हे लक्षात ठेवा.
* अर्धे भोजन सोडून उठल्यास परत भोजन करु नका. भोजन करताना मौन पाळा. भोजन चावून चावून खावा. रात्री पोटभर, तटस्थ जाई पर्यत खावू नका.
* साधारण ३२ वेळा घास चावून खावेत.
* भोजन करताना अगोदर कडू घास खा, नंतर खारट आणि तिखट, आंबट खा आणि शेवटी गोड खात जा. तसेच पहिले रसाळ, त्याच्यामध्ये जड पदार्थ त्यानंतर द्रव पदार्थ ताक वगैरे घ्यावे.
* थोडे थोडे खाणार्‍याला आरोग्य, आयु, बल, सुख, सुन्दर संतान आणि सौंदर्य प्राप्त होते.
* ज्याने प्रसिद्धीसाठी, जाहिरात करुन अन्नदान करत असेल तेथे कधीही भोजन करु नये. तसेच तामसिक भोजन करु नये.
* कुत्र्याने स्पर्श केलेले, रजस्वला स्त्रीच्या हातचे भोजन करु नये. श्राध्दाचे भोजन, तोंडाने फुकलेले भोजन, अपमान, अनादर युक्त, अवहेलना करुन दिलेले भोजन कधीही करु नये.
* अध्यात्मात मांसाहार ग्राह्य नाही, म्हणून आध्यात्मिक मनुष्याने मांसाहार करु नये. त्यामुळे सेवेत आळस, त्या जीवाचे संचित दोष आपल्या मागे लागतात. ते दिसत नाही कारण ते दोष फार सुक्ष्म असतात. आध्यात्मिक माणसाने कधीही खाली मुंडी पाताळ धुंडी वागू नये व माळ वरती करुन दारु, भोजन करु नये.