गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (15:51 IST)

वीट की तात्या, साईबाबांच्या समाधीचे गूढ जाणून घ्या

brick was very dear to Sai Baba of Shirdi
साईबाबांच्या जवळ नेहमी एक वीट असायची. ते त्या विटेवरच डोकं ठेवून झोपायचे. त्या विटेलाच त्यांनी उशी बनवून ठेवली होती. ही वीट त्या काळाची आहे, ज्या वेळी साई बाबा वैकुंशाच्या आश्रमात शिकत होते. वैकुंशाचे इतर शिष्य साईबाबांशी वैर ठेवायचे पण वैकुंशाच्या मनात बाबांसाठी प्रेम वाढत गेले. एके दिवशी त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी बाबांना आपल्या सर्व शक्ती दिल्या आणि ते बाबांना जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांनी पंचाग्नी तपश्चर्या केली. तिथून परत येताना काही मुस्लिम कट्टरपंथीयांनी साईबाबांवर विटा आणि दगड फेकण्यास सुरू केले. 
 
बाबांना वाचविण्यासाठी वैकुंशासामोर आले तेव्हा वैकुंशाच्या डोक्याला वीट लागून ते रक्तबंबाळ झाले. बाबांनी ताबडतोब कपड्याने त्या वाहत्या रक्ताला स्वच्छ केले आणि त्याच कपड्याला वैकुंशाने बाबांच्या डोक्याला तीन वेढे घेऊन बांधून दिले आणि म्हणाले की हे तीन वेढे संसारातून मुक्त होण्यासाठी तसेच ज्ञान आणि सुरक्षिते विषयी आहे. 
 
ज्या विटेने दुखापत झाली, बाबांनी ती वीट उचलून आपल्या पिशवीत ठेवली त्या नंतर त्यांनी आयुष्यभर ती वीट आपल्या उशाशी ठेवली.
 
सन 1918 मध्ये सप्टेंबर महिन्यात दसऱ्याच्या काही दिवसांपूर्वी मशीदीची स्वच्छता करताना बाबांचा एक भक्त माधव फासलेच्या हातून ती वीट तुटली. द्वारकामाईमध्ये असणारा प्रत्येक भक्त स्तब्ध होऊन बघू लागला. 
साईबाबा भिक्षावळी घेऊन आल्यावर त्यांनी ती तुटलेली वीट बघितली आणि म्हणाले की -'हीच माझी जीवनसाथी होती आता ही तुटली समजावं की माझी वेळ पूर्ण झाली आहे. बाबा तेव्हापासून आपल्या महासमाधीची तयारी करू लागले. 
 
तथापि, असे ही म्हटले जाते की दसऱ्याच्या काही दिवसांपूर्वी साईबाबांनी आपल्या एक भक्त रामचंद्र पाटील ह्यांना दसऱ्यावर 'तात्याच्या' मृत्यूबद्दल सांगितले होते. तात्या हे बायजाबाईंचा मुलगा असे. आणि बायजाबाई या साईबाबांच्या परमभक्त होत्या. तात्या, साईबाबांना 'मामा' म्हणून म्हणायचे साईबाबांनी तात्याला जीवनदान देण्याचा निर्णय घेतला आणि तात्याच्या ऐवजी स्वतःच्या शरीराचे बलिदान दिले.