शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (11:10 IST)

तुळशीला पाणी घालताना हा सोपा मंत्र म्हणावा, घरात सुख कायम टिकतं

basil leaves
हिंदू धर्मात तुळशीचा खूप महत्तव आहे. तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज घरात तुळशीच्या रोपाला जल अर्पण करतात तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या पानांच्या पावित्र्याचा अंदाज यावरून बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य दाखवलं जात नाही. तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि तिची नियमित पूजा केल्याने लक्ष्मीसह भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशीही धार्मिक मान्यता आहे. तुळशीला पाणी घालताना विशेष मंत्राचा जप केला पाहिजे ज्याने ही पूजा पूर्णपणे स्वीकारली जाते, असे मानले जाते. अशा वेळी प्रत्येकाने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप करावा.
 
तुळशीपूजन पद्धत
जेथे तुळशीची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी देवी वास करते असे म्हटले जाते. यासोबतच भगवान विष्णूचाही वास असतो. यामुळेच ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दररोज तुळशीला जल अर्पण करण्याचा सल्ला देतात. धार्मिक पद्धतीने दररोज तुळशीला जल अर्पण करावे. पण तुळशीची पूजा नेहमी स्नान केल्यानंतरच करावी. धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतरच तुळशीला जल अर्पण करावे. तसेच रविवारी तुळशीला हात लावू नये किंवा पाने तोडू नयेत. असे मानले जाते की रविवारी असे केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा कोप होतो.
 
तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जाप करावा
हिंदू धर्मग्रंथांमध्ये तुळशीच्या पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार जेव्हाही तुळशीला जल अर्पण केले जाते, त्या वेळी तुळशी मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा उच्चार केल्यास पूजा स्वीकारली जाते, असे सांगितले जाते. यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय घरात सुख-समृद्धी आणि आनंद अबाधित राहतो. अशा वेळी तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप अवश्य करावा.
 
तुलसी पूजा मंत्र
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते