शनिदेवाच्या दहा नावांचा जप करा
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेवाच्या दहा नावांचा जप करावा.
कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।
या मंत्रात शनीची 10 नावे आहेत. कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद आणि पिप्पलदा अशी ही नावे आहेत.
शनिदेवाच्या मंदिरात शनिपूजेसोबतच शनिदेवाच्या दहा नाम मंत्रांचा जप करावा. या जपाने शनि दोष दूर होतात. मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.