गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (00:36 IST)

मंदिरातील देवांवर वाहिलेले हार-फूल मिळाले तर त्याचे काय करावे ?

जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा पुजारी त्यांना देवावर वाहिलेले फूल प्रसाद देतो. याला आशीर्वाद समजून लोक घरी घेऊन येतात पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातात तर सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आता या फुलांचे काय करावे? काही अशुभ होण्याच्या भितीमुळे लोक याला फेकायला सुद्धा घाबरतात. आमच्या शास्त्रांमध्ये याचे समाधान देण्यात आले आहे. देवावर वाहिलेले फुलांना दोन तीन पद्धतीने तुम्ही ठेवू शकता.

जर तुम्हाला मंदिरात देवाला वाहिलेले फूल किंवा हार देण्यात आले तर त्याला सर्वात आधी घराच्या त्या अल्मारीत ठेवा जेथे तुम्ही पैसे व दागिने ठेवता. जर प्रसादात फूल देण्यात आले तर त्याला तिजोरीत एखादी लहान पिशवी, कपडा किंवा कागदात बांधून ठेवायला पाहिजे.

जर तुम्ही यात्रा करत असाल आणि एखाद्या मंदिरातून तुम्हाला फूल किंवा हार मिळाला तर सर्वात मोठी समस्या त्या वेळेस येते की यात्रेत त्याला कसे  काय सांभाळून ठेवावे. अशात तुम्ही फुलांना आपल्या उजतव्या हाताच्या तळहातावर घेऊन त्याचा वास घ्या, नंतर त्याला एखाद्या झाडाखाली किंवा नदी, तलावात वाहून द्यायला पाहिजे. वास घेतल्याने फुलात असणारी सकारात्मक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यात येते. त्यानंतर फुलाला सोबत ठेवायची गरज नसते. या प्रकारे प्रवासात मंदिरातून मिळालेले फूल इत्यादी सांभाळण्याची गरज पडणार नाही.