तेथे कर माझे जुळती

gajanan maharaj
Author स्नेहल प्रकाश| Last Updated: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (12:10 IST)
एकदा सकाळी सकाळी माझा दीर म्हणाला आपण शेगांवला जायचे का ? मग काय लागलो उत्साहात तयारीला
गाडी ठरवण्यापासून पूर्ण तयारीनिशी आम्ही पूर्ण कुटुंबीय नागपूरहून एक तासात निघालोही मन तर कधीच शेगांवात पोहोचले होते....
जाताना अमरावतीच्या देवीची ओटी भरली तिथल्या प्रसन्न वातवरणात देवीचे मुखवटे मंद स्मित करीत भरभरून आशीर्वाद देत होते.
आता मात्र महराजांच्या भेटीची ओढ लागली होती.

थोड्याच वेळात शेगांव नगरीत पोहोचलो. सुटीमुळे खूप गर्दी असेल असे वाटत असतानाच अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती किंबहूना तिथल्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे जाणवले नाही. अर्ध्या तासात याची देही याची डोळा मन भरून दर्शन झाले. सासू सासर्यांना तर थेट दर्शनाला जाऊ दिले. प्रसन्न गाभारा, फुलांची शेज, महराजांची वत्सल मूर्ती बघून मन सद्गदित झाले. खूप दिवसांची ईच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. तोच अनुभव समाधी स्थान आणि पोथीचा अध्याय वाचताना आला.

तेथील स्वच्छता, प्रसाद वाटपाचे व्यवस्थापन, सेवेकर्यांची निस्वार्थ सेवा, आनंद विहार येथे निर्माण केलेला निसर्गरम्य परिसर म्हणजे बेस्ट मॅनेजमेंटचे उदाहरण आहे. मन पुन्हा पुन्हा त्या योगिराण्याच्या दर्शनाची कास धरते. आणि परतीची वाट धरताना कारंजाच्या नृसिंह सरस्वतीच्या दर्शनाने मन पुलकित होते आणि आम्ही नागपूरची वाट धरतो ते परत केव्हा दर्शन होईल ही हुरहूर मनात घेवूनच.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक
श्री गजानन महराजांना शिरसावंद्य साष्टांग नमस्कार

विनीत : स्नेहल खंडागळे


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीराम पंचवटी नाशिक येथे थांबले होते, जाणून घ्या खास 8 ...

श्रीराम पंचवटी नाशिक येथे थांबले होते, जाणून घ्या खास 8 गोष्टी
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, ...

झाले झाले चैत्र गौरी चे आगमन

झाले झाले चैत्र गौरी चे आगमन
खळणे मांडले बाळाचे, अवती भवती सारी, थंड पन्हे करा,करा डाळ कैरीची,

श्रीराम नवमी 2021: श्रीरामाचे 10 सोपे मंत्र, त्वरित देतील ...

श्रीराम नवमी 2021: श्रीरामाचे 10 सोपे मंत्र, त्वरित देतील कष्टांपासून मुक्ती
राम नावात अपार शक्ती आहे. त्याचे नाव लिहिले दगड पाण्यात न बुडता तरंगत होते. त्यांच्या ...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ...

Ram Raksha Stotra : राम रक्षा स्तोत्राचे 10 रहस्य

Ram Raksha Stotra : राम रक्षा स्तोत्राचे 10 रहस्य
श्री राम रक्षा स्तोत्र बुध कौशिक ऋषींद्वारे रचित श्रीराम स्तुती आहे. यात प्रभू ...

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...