देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

devghar
Last Modified गुरूवार, 17 जानेवारी 2019 (00:19 IST)
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी.
शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत.
गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपू नये.
शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.
देवापुढे श्रीफळ (नारळ) वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.
देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजू नये.
द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी, दुर्वा तोडू नयेत.
आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देवू नये.
देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे.
देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न पसरविता पंख्याने पसरावा.
समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती असाव्यात, सम असू नयेत.
अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.
मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
एका हाताने देवाला नमस्कार करू नये.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून घालावे

दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून घालावे
प्राचीन काळापासून लवकर उठण्याचे खूप महत्त्व असल्याचे आपण ऐकत आहेत. त्यामागचे शास्त्रोक्त ...

Mauni Amavasya 2020 अमावस्येला अशुभ घडू नये म्हणून हे टाळा

Mauni Amavasya 2020 अमावस्येला अशुभ घडू नये म्हणून हे टाळा
असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक उर्जेचा प्रभाव अधिक असतो. म्हणून या दिवशी ...

श्री महामृत्युंजय यंत्र : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या

श्री महामृत्युंजय यंत्र : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या
भगवान शंकराचे नामस्मरण या मृत्युन्जय जपात आहे. हिंदुस्थानात आसेतुहिमाचल या मंत्राने भगवान ...

गायत्री यंत्रम

गायत्री यंत्रम
प्रत्येक यंत्रामागे त्या-त्या देवतेचे प्रतीक असते. यंत्रावर त्या देवतेची बीजाक्षरे ...

Mauni Amavasya 2020: मौनी अमावास्येला हे दान करणे ठरेल शुभ

Mauni Amavasya 2020: मौनी अमावास्येला हे दान करणे ठरेल शुभ
पौष महिन्यातील अमावस्याच आपलं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...