testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नवस कशासाठी ?

काही मिळविणसाठी, काही प्राप्त करणसाठी लोक का करतात देवाला? तेच समजत नाही. हाच प्रश्न पडतो. खरंतर परमेश्वराने एवढं
सुंदर आयुष्य दिलं आहे. जग सुंदर दिलं आहे, त्याचा उपयोग करून जगण्याची संधी दिली आहे तरी काही तरी मागण्यासाठी माणसं
परमेश्वराला नवस का करतात? नवस करताना ज्यानं दिलं त्यालाच काही तरी देण्याचं आमिष का दाखवतात?

आपण जगत असताना दुसर्‍याचा विचार करून जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद तर मिळेलच त्यापेक्षा आपले आयुष्य सुंदरहोईल. अपेक्षा न ठेवता जगलो तर वेदना होणार नाही. दुसर्‍याला त्रास होणार नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी, समाजसुधारकांनी
आपल्याला हेच दाखवून दिलं आहे. सांगितलं आहे. शिकवलं आहे. तरीही आपण आपल्या वाटा चुकतो नंतर देवाला मागत सुटतो, दिलं नाही
तर आमिष दाखवून नवस बोलतो, नवस करतो. हे नवस करताना आपण काय करतो हेच आपल्याला समजत नाही. तरीही लोक आजनवस करताना दिसून येतात. हे नवस केल्यावर तरी आपला हेतू साध्य होतो का? आपले स्वप्न पूर्ण होते का? सर्वाचे नवस पूर्ण होत
असते तर आजचे जगही पूर्ण बदलून गेले असते. पण तसे होऊ शकत नाही. आनंद मिळण्यासाठी, मन:शांती मिळविण्यासाठी समाधान
मिळण्यासाठी परमेश्वराची पूजा, भक्ती करण्यास विरोध नसावा, हरकत नसावी. ती ज्याला कराविशी वाटते त्याने ती करावी. ती कशी करावीहे ज्याचे त्याने ठरवावे. त्याला नियम किंवा पद्धत ही ज्याची त्याची असते. ती त्याने इतरांवर लादू नये. मार्गदर्शन करावे पण बळजबरी
नको. त्याने कोण व्हावे? त्याने काय करावे? हे त्याने ठरवावे. तरीही त्यासाठी चांगले प्रयत्न जरूर हवेत. इच्छाशक्ती ठेवावी. परंतु वाममार्ग
धरू नये. राजा हरिश्चंद्र, येशूख्रिस्त, गौतम बुद्ध यांच्या गोष्टी वाचल्या तर विचारांना योग्य दिशा मिळते.

संत कबीर, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज या सारख्या संतांच्या शिकवणीचा आपल्याला विसर होता कामा नये.

आपल्या घरातील सर्वाना यांच्या आठवणी करून सतत त्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यांच्या गोष्टींमुळे, शिकवणीमुळे आपले जीवन
सुंदर होण्यास मदत होईल. जीवन आनंदमय होईल. मग देवाला नवस करण्याचा प्रश्नच येईल कसा? ज्याला नवस करतो तो काही जादूगारनाही. नवसाने सर्व काही मिळते असे नाही. तुमच्या आयुष्यात अगोदरच दिलेले असते. पण वेळ आल्यावर मिळते. वेळेच्या आधी आणि
नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नसते. हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. काही मिळविण्यासाठी प्रयत्न करू नये. दुसर्‍याचे अहित करू
नये. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. प्रेमाने जग जिंकता येते. तेव्हा नवस करू नयेत, नवसाला काही आधार नाही, हेच खरं आहे.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य