शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (16:45 IST)

रुक्मिणी देवीला प्रसन्न करणे सोपे, नियमित रुपाने हे करा, जीवनात यश मिळवा

Maa Rukmini Mantra Jaap
रुक्मिणी देवी भगवान श्री कृष्णाची अर्धांगिनी आहे. धार्मिक मान्यतेप्रमाणे नियमित रूपाने प्रभू श्री कृष्ण आणि रुक्मिणी देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात. धार्मिक ग्रंथांत सांगितले गेले आहे की श्री कृष्ण या जगाचे पालनहार आहे आणि नियमित भगवान श्री कृष्ण आणि देवी रुक्मिणीची पूजा आराधना केल्याने वैकुंठ धामाची प्राप्ती होते.
 
जर आपण जीवनात येत असलेल्या अडचणींपासून मुक्त होऊ बघत असाल तर नियमित रुपाने रुक्मिणी देवीच्या मंत्रांचा जाप केला पाहिजे. हे मंत्र जाप केल्याने त्रासांपासून मुक्ती मिळते. तसेच अविवाहित मुली लवकर लग्नाचे योग यावे यासाठी काही मंत्रांचा जाप करु शकतात. तर जाणून या मंत्रांबद्दल-
 
रुक्मिणी देवीच्या मंत्रांचा जाप Maa Rukmini Mantra Jaap
 
- क्लेश दूर हेतु मंत्र
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:॥
 
-कृं कृष्णाय नमः।
 
लक्ष्मी मंत्र
लीलादंड गोपीजनसंसक्तदोर्दण्ड
बालरूप मेघश्याम भगवन विष्णो स्वाहा।
 
विद्या प्राप्ति मंत्र
ॐ कृष्ण कृष्ण महाकृष्ण सर्वज्ञ त्वं प्रसीद मे।
रमारमण विद्येश विद्यामाशु प्रयच्छ मे॥
 
धन प्राप्ती मंत्र
गोवल्लभाय स्वाहा।
 
इच्छा मंत्र
'गोकुल नाथाय नमः।
 
बाधा निवारण मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीकृष्णाय गोविंदाय
गोपीजन वल्लभाय श्रीं श्रीं श्री'।
 
मधुरता प्राप्ती हेतु मंत्र
ऐं क्लीं कृष्णाय ह्रीं गोविंदाय
श्रीं गोपीजनवल्लभाय स्वाहा ह्र्सो।
 
इच्छित वर प्राप्ती हेतु मंत्र
कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी।
नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरू ते नम:।।
इच्छित जीवनसाथी आणि लवकरच विवाहासाठी या मंत्राचा दररोज जप करावा. त्यामुळे लग्नाचे योग जुळुन येतात.
 
प्रेम विवाह हेतु मंत्र-
क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा।'
प्रेम विवाह करु इच्छित असणार्‍यांनी या मंत्राचा दररोज जाप करावा.