महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...

Urvashi in mahabharata
Last Modified बुधवार, 27 मे 2020 (06:44 IST)
अंबा ही महाभारतात काशीराजची कन्या होती. अंबाला अजून 2 बहिणी अंबिका आणि अंबालिका असे. ज्यावेळी अंबा, अंबिका आणि अंबालिकाचे स्वयंवर होणार होते. त्यावेळी भीष्माने एकट्यानेच तेथे आलेल्या सर्व राजांना पराभूत करून तिन्ही कन्यांचे हरण करून त्यांना हस्तिनापुरात आणून माता सत्यवतीच्या समोर उभे केले. जेणे करून त्यांचे लग्न हस्तिनापुराचे राजा आणि सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य यांच्यासोबत संपन्न केला जावा. अश्या प्रकारे अंबिका आणि अंबालिका विचित्रवीर्यच्या बायका झाल्या.
परंतु विचित्रवीर्यच्या आकळी मृत्यूमुळे त्या दोघी निःसंतानच राहिल्या. भीष्माने तर ब्रह्मचर्य व्रत घेतले होते आणि आता सत्यवतीच्या दोन्ही मुलांच्या आकळी मरण पावल्यामुळे कुरुवंश संकटात सापडले होते. अश्यावेळी सत्यवतीला आपल्या थोरल्या मुलगा वेदव्यासांची आठवण झाली. तिने नियोग विधीने अंबिका आणि अंबालिकाचे गर्भधारण करविले.

ज्यावेळी वेदव्यास अंबिकाशी शारीरिक संबंध करत होते तिने लज्जावश आपले डोळे मिटून घेतले. जेणे करून तिचे होणारे मूल धृतराष्ट्र हे आंधळे जन्माला आले.

पहिल्या मुलाच्या नंतर अंबिका ऋतुमती झाल्यावर पुन्हा सत्यवतीने तिच्या जवळ वेदव्यासांची पाठवणी केली. जेणे करून तिला एक स्वस्थ मूल होवो. या वेळी अंबिका स्वतः न जाता आपल्या दासीला आपल्या रूपात तयार करून पाठवते. वेदव्यास आणि तिच्या मिलनापासून विदुर चे जन्म झाले, जे धृतराष्ट्र आणि पांडवांचे भाऊ म्हटले जाते.

सत्यवतीने अंबालिकाला सूचना केल्या की तिने अंबिकासारखे आपले डोळे मिटू नये. ज्यावेळी वेदव्यास अंबालिकाच्या समोर गेले ती लाजेमुळे पिवळी पडली. या कारणामुळे तिच्या पोटी पांडूचा जन्म झाला. जे जन्मापासूनच कावीळने ग्रस्त होते.

ज्यावेळी अंबा सांगते की तिने राजा शाल्वला आपल्या पती रूपात वरले आहे, हे कळल्यावर विचीत्रवीर्य तिच्याशी लग्न करण्यास नकार देतो. भीष्म राजा शल्याकडे तिची पाठवणी करतात. पण राजा शाल्व तिचा स्वीकार करण्यास नकार देतात. अश्यावेळी ती परत हस्तिनापुरात येते आणि भीष्माला म्हणते हे आर्य आपण मला जिंकून आणले आहे आता आपण माझ्याशी लग्न करावे.

भीष्म आपल्या प्रतिज्ञामध्ये बांधल्या गेल्यामुळे तिच्या मागणीला मान्य करत नाही. त्यामुळे अंबा संतापते आणि भीष्मला म्हणते की आपल्या मृत्यूला मी कारणीभूत असणार. असे म्हणून परशुरामांकडे जाते आणि आपले दुःख सांगून मदत मागते. परशुराम अंबाला म्हणतात की देवी आपण काळजी करू नका मी आपले लग्न भीष्मासह लावून देईन.

परशुराम भीष्माला बोलवतात पण भीष्म त्याच्यांकडे जात नाही यावर संतापून परशुराम भीष्माकडे जातात. दोघांमध्ये भयंकर युद्ध होतं. दोघेही अभूतपूर्व योद्धा असे. म्हणून विजय आणि पराभवाचा निर्णय होणे अशक्य असताना शेवटी देवता मध्यस्थी करून युद्ध थांबवतात. निराश होऊन अंबा अरण्यात तपश्चर्या करावयास निघून जाते.

ती शंकराची तपश्चर्या करते. तिच्यावर प्रसन्न होऊन महादेव तिला वर देतात की पुढच्या जन्मी ती भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत असणार. हे वर मिळाल्यावर ती स्वतःचे जीव संपवते आणि पुढल्या जन्मी राजा धृपदच्या घरी शिखण्डी रूपाने जन्म घेते. शिखण्डी कुरुक्षेत्राच्या युद्धात भीष्माची मृत्यूला कारणीभूत ठरले, कारणं कृष्णाने त्या दिवशी शिखण्डीला अर्जुनाचे सारथी बनविले असतात.

तसेही भीष्माला पूर्वजन्मीचे विदित असल्यामुळे ते एका महिलेविरुद्ध शस्त्र उचलण्यास नकार देतात. त्याचं दरम्यान अर्जुन संधी साधून भीष्मावर प्रहार करतो ज्यामुळे भीष्म जखमी होऊन कोलमडून खाली जमिनीवर पडतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला आश्चर्यचकित करतील
भगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?
त्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...

श्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र

श्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र
"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम ! श्री ...

श्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा

श्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा
यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.

अंतरंग म्हणजे "राम"

अंतरंग म्हणजे
अंतरंग म्हणजे "राम" श्वास-उश्वास आहे "राम" जपते मन निरंतर "राम" दिसतो डोळ्यास मम "राम"

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...