testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्री साईबाबा संस्थान श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ संपूर्ण वेळापत्रक

Last Modified शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:47 IST)
शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक २६ जुलै २०१८ ते शनिवार दिनांक २८ जुलै २०१८ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी २७ जुलै रोजी चंद्रग्रहण असल्‍यामुळे श्रींच्‍या शेजारती नंतर समाधी मंदिर बंद राहाणार असून त्‍याऐवजी शनिवार दिनांक २८ जुलै २०१८ रोजी उत्‍सवाचे सांगता दिवशी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहाणार असल्‍याची माहिती संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या हयातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी गुरुवार दिनांक २६ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ९.०० व रात्रौ ९.३० ते १०.३० यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम, रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ९.०० व रात्रौ ९.३० ते १०.३० यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम, रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. तसेच यादिवशी चंद्रग्रहण असल्‍यामुळे रात्रौ ११.०० वाजता शेजारती नंतर समाधी मंदिर बंद होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी शनिवार दिनांक २८ जुलै सकाळी ४.०० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ६.१५ वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.३० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ११.०० यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होईल. तसेच या दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून श्रींची शेजारती व दिनांक २९ जुलै रोजीची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.
उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दिनांक २५ जुलै २०१८ रोजी दुपारी १.०० ते सायंकाळी ६.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील व्यासपीठावर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे सायंकाळी ६.१० वाजता चिठ्ठ्या काढून निश्चित करण्यात येतील. तसेच दिनांक २८ जुलै रोजी होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे अनाऊसमेंट कक्षामध्‍ये मंदिर कर्मचा-यांकडे आगाऊ नोंदवावीत, असे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्वस्त, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.


यावर अधिक वाचा :

मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत

national news
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

national news
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे

national news
ख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

राशिभविष्य