गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (19:31 IST)

शनी महाराजांचे स्त्रीरूप......

गुजरातमधील भावनगरजवळ सारंगपुरात कष्टनिरसंन मारुतीचे देऊळ आहे. जणू हा एक किल्लाच आहे. ह्या देऊळात मारुती सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहे. त्यांच्या मूर्ती जवळ माकडांची सेना पण दिसते. मारुतीच्या जवळ शनिदेव स्त्रीच्या रूपात मारुतीच्या पायथ्याशी बसलेले आहे. 
 
आख्यायिका अशी आहे की काही काळपूर्वी शनिदेवाचे कोप फार वाढले होते. त्यांच्या कोपापासून वाचण्यासाठी भक्तगण मारुतीकडे याचना घेऊन गेले आणि त्यानंतर मारुतीने शनिदेवास दंड देण्याचे निश्चित केले. शनिदेवास हे कळताच त्यांने उपाय योजिला. त्यांना हे विदित होते की मारुती बाळ ब्रम्हचारी आहे. ते कधीपण स्त्रियांवर कोप धरत नाही. त्यासाठी त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी स्त्रीचे रूप घेतले आणि मारुतीकडे क्षमा मागितली. मारुतीने त्यांना क्षमा दिली. या देवळात याच आख्यायिकेनुसार शनिदेवांना मारुतीच्या पायथ्याशी स्त्री रूपात पूजतात.
 
मान्यता आहे की बजरंग बलीच्या या रुपाने सर्वांना शनीच्या प्रकोपापासून मुक्ती दिली म्हणून येथे पूजा केल्याने शनीचा प्रकोप दूर होतो. येथे दर्शन केल्याने शनीची दशा नाहीशी होते.
 
येथे भक्तांनी नारळ अर्पित करुन कामना केल्यास त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच शनीचा प्रकोप दूर होऊन संकटमोचन हनुमानाचं रक्षा कवच प्राप्त होतो.