शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2019 (15:39 IST)

शुक्रनीतिः जोडीदार आणि या 2 वस्तूंना कधीपण दुसर्‍यांच्या भरवशावर सोडू नये, श्रीरामाला देखील झाला होता पश्चात्ताप

मानव जीवनाला योग्य आणि यशस्वी बनवण्यासाठी शास्त्रात बर्‍याच प्रकारचे उपदेश देण्यात आले आहे. प्राचीन काळात सांगण्यात आलेले ते मार्ग वर्तमान वेळेत प्रभावी ठरत आहे. नीतीचे महान ज्ञाता आणि जाणकार शुक्राचार्य यांनी जगात भरवसा हा सर्वात मोठा शब्द आहे असे मानले आहे. भरवसा आणि विश्वास लोकांना एकमेकच्या जवळ आणतो आणि नाते घट्ट बनवतो. पण शुक्राचार्यांप्रमाणे काही बाबतीत दुसर्‍यांवर बिलकुलपण भरवसा नाही करायला पाहिजे. जाणून घ्या विद्वान शुक्राचार्याप्रमाणे कोणत्या परिस्थितीत दुसर्‍यांवर भरवसा करू नये असे म्हटले आहे.
 
दूसर्‍यांच्या भरवशावर सोडू नये आपले जोडीदार
  
पराधीनं नैव कुय्यार्त तरुणीधनपुस्तकम्। 
कृतं चेल्लभ्यते दैवाद भ्रष्टं नष्टं विमिर्दितम्।। 
 
शुक्राचार्य यांनी शुक्रनितीत याबद्दल म्हटले आहे, की व्यक्तीला कधीपण दुसर्‍यावर भरवसा करून आपले जोडीदार त्यांच्यासोबत नाही सोडायला पाहिजे. तुम्ही जितक्या चांगल्याप्रकारे आपल्या जोडीदाराच्या मान मर्यादेचे आणि त्याच्या गरजांचे लक्ष ठेवता तेवढं कोणी दुसरे ठेवू शकत नाही, भले मग तो तुमचा किती ही जवळचा किंवा  विश्वास पात्र असो. याचे ऐक उदाहरण तुम्हाला रामायणात मिळेल. श्री रामाने आपला भाऊ लक्ष्मणावर विश्वास करून सीतेची जबाबदारी त्याला सोपवली होती. कारण काही असो पण लक्ष्मण सीतेला एकटा सोडून गेला ज्याच्या फायदा रावणाला मिळाला आणि त्याने तिचे अपहरण केले. जर श्री राम स्वत: तिथे असते तर कदाचित ते त्या स्थितीला टाळू शकले असते.
 
एक इतर उदाहरण राधा आणि कृष्णाचे आहे. राधा कृष्णाशी एका गोष्टीवर नाराज होऊन गोलोकला जाते आणि आपल्या अनुपस्थितीत आपली सखी ललिताला कृष्णाचे लक्ष ठेवायला सांगते. राधा जेव्हा परतून येते तेव्हा तिची मैत्रीण ललिता आणि कृष्णाला हास-परिहास करताना बघते आणि यामुळे तिचा क्रोध अधिकच वाढून जातो.
आपल्या धन संपत्तीला स्वत:नाचे सांभाळायला पाहिजे  
पैशांच्या बाबतीत कुठल्याही दुसर्‍या व्यक्तीवर भरवसा नाही केला पाहिजे. पैशाच्या बाबतीत लोकांचे नियम बदलायला वेळ लागत नाही म्हणून आपल्या प्रत्येक देवाण घेवाणीचा लेखा आपल्या जवळ ठेवा. शास्त्रात असे देखील म्हटले आहे की मनुष्याला आपल्या जमा पुंजीची देखरेख स्वत:ला ठेवायला पाहिजे. दुसर्‍यांच्या भरवशावर धन सोडल्याने नुकसान तुमचंच होत. हे ही लक्षात ठेवा की तुमच्या हातात जेवढा पैसा राहील अडचणीत तोच काम येईल. दुसर्‍यांना दिलेल्या पैशांचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही की तो केव्हा आणि किती परत करेल.
आपल्या पुस्तकांबद्दल देखील दुसर्‍यांवर भरवसा ठेवू नये  
शुक्रनीतित जोडीदार आणि पैशाच्या बाबतीत दुसर्‍यांवर भरवसा ठेवू नाही असे सांगितले आहे. शुक्राचार्यानुसार पुस्तक ज्ञानाचे स्रोत आहे आणि याला दुसर्‍यांच्या हातात नाही द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पुस्तकाचे जेवढ्या चांगल्या प्रकारे लक्ष ठेवाल, तेवढे कोणीच ठेवणार नाही. बर्‍याच वेळा तुम्हाला तुमचे पुस्तक परत मिळणार नाही आणि जर मिळाली तर त्याची स्थिती आधी सारखी राहणार नही. दुसर्‍यांना पुस्तक दिल्यामुळे त्याची क्षती होण्याची शक्यता जास्त असते.