शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते
To see these three objects on a Saturday morning शनिवारचा दिवस न्याय देवता शनीदेवाचा असतो. शनी आणि शनिवाराबद्दल बर्याच लोकांमध्ये गैरसमज असतो. बरेचसे लोक शनिवारचा दिवस शुभ नाही मानत आणि कुठल्याही चुकीच्या कार्यासाठी या दिवसाला जबाबदार ठरवतात. पण शनिवारच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला ह्या 3 वस्तू दिसल्या तर तुमचा दिवस शुभ असू शकतो –
1 भिकारी – शनिवारी सकाळी जर कोणी भिकारी किंवा गरीब व्यक्ती तुमच्या दारावर येतो किंवा दिसतो तर याला शुभ संकेत मानले जातात. जर असे झाले तर तुम्हाला त्यांची योग्य मदत करायला पाहिजे, ज्याने शनीदेव प्रसन्न होतात.
2 सफाई कर्मचारी – शनिवारच्या सकाळी सफाई कर्मचारी दिसला तर तुमचा दिसव शुभ जाईल. खास करून तेव्हा, जेव्हा तो झाडू लावत असेल. असे झाले तर त्याला काही पैसे जरूर द्या. यामुळे तुमचे कार्य निर्विघ्न संपन्न होतील.
3 काळा कुत्रा – शनिवारी काळा कुत्रा दिसणे शुभ मानले गेले आहे. असे झाले तर काळ्या कुत्र्याला तुपलावून पोळी किंवा बिस्किट खाऊ घालावे.