testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुठे आहे हे मंदिर जेथे शिव पार्वतीने विवाह केला होता

mandir
Last Updated: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (15:13 IST)

तुम्हाला माहीत आहे का, की या पृथ्वीवर विद्यमान आहे ती जागा जेथे साक्षात शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता.
उत्तराखंडाचा त्रियुगीनारायण मंदिरच ते पवित्र आणि विशेष पौराणिक मंदिर आहे. या मंदिरात शतकापासून अग्नी जळत आहे. शिव-पार्वतीने या पवित्र अग्नीला साक्षी मानून विवाह केला होता. ही जागा रुद्रप्रयाग जिल्ह्याचा एक भाग आहे. त्रियुगीनारायण मंदिराबद्दल असे म्हटले जाते की हे शिव पार्वतीच्या शुभ विवाहाचे स्थळ आहे. मंदिरात प्रज्वलित अग्नी बर्‍याच युगांपासून जळत आहे म्हणून या स्थळाचे नाव त्रियुगी झाले अर्थात अग्नी जी युगांपासून जळत आहे.
त्रियुगीनारायण हिमावताची राजधानी होती. येथे शिव पार्वतीच्या विवाहात विष्णूने पार्वतीच्या भावास्वरूप सर्व कार्य पार पाडले होते. जेव्हा की ब्रह्म या लग्नात पुरोहित बनले होते. त्या वेळेस सर्व संत मुनींनी या लग्नात भाग घेतला होता. विवाह स्थळाच्या नियत स्थानाला ब्रह्म शिला म्हटले जाते जे मंदिरच्या समोर स्थित आहे. या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन स्थळ पुराणात देखील बघायला मिळते.
विवाहा अगोदर सर्व देवतांनी येथे स्नान केली होती. येथे तीन कुंड बनलेले आहे ज्याला रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रह्मा कुंड म्हणतात. या तिन्ही कुंडात पाणी सरस्वती कुंडातून येत. सरस्वती कुंडाचे निर्माण विष्णूच्या नासिकाद्वारे झाला होता म्हणूनच अशी मान्यता आहे की या कुंडात स्नान केल्याने स्तनहीनतेपासून मुक्ती मिळते.
जे कोणी भाविक या पवित्र स्थानाची यात्रा करतात ते आपल्यासोबत तेथे प्रज्वलित अखंड ज्योतीचा अंगारा आपल्यासोबत घेऊन जातात ज्याने त्यांचे वैवाहिक जीवन देखील शिव पार्वतीच्या कृपेमुळे नेहमी मंगलमय राहते.
वेदांमध्ये उल्लेख आहे की हे त्रियुगीनारायण मंदिर त्रेतायुगात स्थापित झाले होते. जेव्हा की केदारनाथ व बद्रीनाथ द्वापारयुगात स्थापित झाले. अशी मान्यता देखील आहे की या जागेवर विष्णूने वामन अवतार घेतला होता.
पौराणिक कथेनुसार इंद्रासन मिळवण्यासाठी राजा बलिला शंभर यज्ञ करायचे होते, त्यातून बलिने 99 यज्ञ पूर्ण केले होते तेव्हा विष्णूने वामन अवतार घेतल्याने बलिचा यज्ञ भंग झाला. येथे विष्णूची पूजा वामनच्या रूपात केली जाते.
हे मंदिर सध्या चर्चात आहे. असे म्हटले जाते की येथे भारतातील मोठ्या घराण्याचे लग्न होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये?

national news
लिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

राशिभविष्य