गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (15:41 IST)

करावा विवाह तुळसा बाईचा

करावा विवाह तुळसा बाईचा,
सावळ्याच्या त्या अर्धांगिनीचा,
नटवा सजवा, तुळसा माइला,
साज शृंगार अर्पण करावं तिला,
करून शिंपण, काढावी रांगोळी,
सजवून मांडव, नेसवावी साडी-चोळी,
धरून अंतरपाट,मंगलाष्टके म्हणावे,
श्रीरंगा सवे, मंगल परीणय करावे,
वर्षो नी वर्षे, हेच करावे शुद्धभावें,
सुख-समृध्दीनी घर, नांदते सुखावें!
....अश्विनी थत्ते