गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Vasant Panchami 2023 Saraswati Mantra सरस्वती देवीचे दिव्य मंत्र, विद्या, बुद्धी आणि ज्ञान प्राप्ती होईल

Vasant Panchami 2023
वसंत पंचमी सरस्वती देवीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. वीणावादिनी मां शारदाचे स्वरूप सौम्य आहे आणि त्यांच्यासाठी जपण्यात येणारे मंत्र दिव्य. या मंत्रांचा जप करुन बल, विद्या, बुद्धी, तेज आणि ज्ञानाची प्राप्ती होते.
 
* 'ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां। सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।'
 
* 'सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाल्यै नमो नम:।
वेद वेदान्त वेदांग विद्यास्थानेभ्य एव च।।
सरस्वति महाभागे विद्ये कमललोचने।
विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते।।'
 
* एकादशाक्षर सरस्वती मंत्र : ॐ ह्रीं ऐं ह्रीं सरस्वत्यै नमः।
 
* 'वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि। मंगलानां च कर्त्तारौ वन्दे वाणी विनायकौ॥'
 
अर्थातः अक्षर, शब्द, अर्थ आणि छंदाचे ज्ञान देणार्‍या भगवती सरस्वती आणि मंगलकर्ता विनायकाची वंदना असो - श्रीरामचरितमानस
 
वसंत पंचमीला शिव पूजनाचे देखील विशेष महत्व आहे. या दिवशी शिवाची पार्थिव प्रतिमा स्थापित करुन विधीपूर्वक पूजा-अर्चना करुन दूध, दही, तूप, साखर, मध, पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावे.