गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

देवतेचे दर्शन कसे घ्यावे?

* देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी.
* देवतेची मूर्ती व तिच्या समोर असलेली कासवाची (शिवाच्या देवळात नंदीची) प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.
* आधी देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे व शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे.
* देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा. फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.