शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2015 (10:57 IST)

प्रेम

तुम्ही कोणाबरोबर एकदम आरामात आणि मोकळे ढाकळे राहू शकता? अशा व्यक्तीबरोबर, जी तुमच्या प्रेमाची शंका घेत नाही. जी हे गृहीत धरते की तुमचे तिच्यावर प्रेम आहे, हो की नाही?
 
जेव्हा कोणी तुमच्या प्रेमाबद्दल शंका घेते किंवा तुम्हाला सतत प्रेम सिद्ध करावे लागते, तेव्हा ते शिरावरचे प्रचंड ओझे होते. ते तुम्हाला विचारतात आणि प्रत्येक कृतीत खुलासा मागतात. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीचा खुलासा करणे हे एक ओझे आणि तुमचा स्वभाव हे ओझे टाकून देण्याचा आहे. कारण तुम्हाला ते मोकळेपणाचे वाटत नाही. 
 
जेव्हा तुम्ही एखाद्याच कृतीची कारणमीमांसा मागता, तेव्हा तुम्ही स्वत:साठी न मागत असता. तुम्ही न मागता तेव्हा अंतर निर्माण करता. तुमचा सगळा हेतू जवळीक साधण्याचा असतो. पण त्याऐवजी तुम्ही अंतर निर्माण करता. 
 
तुम्ही शाश्वत साक्षीदार आहात. तुम्ही जेवढे स्वत:च कृतीचे साक्षीदार असता, तितकेच इतरांच कृतीचेही असता. जेव्हा कुणी तुम्हाला तुमच्या कृतीचा खुलासा विचारतात, तेव्हा ते कर्ताभाव ठेवून बोलत असतात. आणि तेच कर्तेपण तुमच्यावर लादत असतात. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. 
 
खुलासा मागूही नका तसाच देऊही नका. 
 
 
श्री श्री रविशंकर 
‘मौन एक उत्सव’ मधून साभार