मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (09:44 IST)

'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर' ची जबरदस्त कमाई

'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर'या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय. भारतात एवढी जबरदस्त कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरलाय. ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी  ४० कोटी रुपयांची कमाई केलीय. या चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘दंगल’, ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. ‘डिस्ने इंडिया’ने प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार या चित्रपटाने देशभरात ४० कोटी रुपयांची कमाई केली असून यावर्षीचा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट वीकेंडपर्यंत १०० कोटी क्लबमध्ये दाखल झालाये. या चित्रपटात पहिल्यांदाच १९ सुपरहिरोज एकत्र आल्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. हा सिनेमा २०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.