मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (09:15 IST)

‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच

-pokemon-detective-pikachu-trailer-launch
आता पॉकेमनवर आधारित चित्रपटही लवकर येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चरनं ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच केला आहे. आतापर्यंत कार्टुनमध्ये पाहिलेला अॅशचा लाडका पिकाचू या चित्रपटात हेरच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
पॉकेमनमधलं पिवळ्या रंगाचं पिकाचू हे कॅरेक्टर सर्वांच्याच आवडीचं त्यामुळे ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’मध्ये हाच लोकप्रिय पिकाचू नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्तही मूळ पॉकेमन सीरिजमधले अनेक पॉकेमन या चित्रपटातून पाहता येणार आहे. ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’ची कथा ही टीम गुडमन या पॉकेमन ट्रेनर भोवती फिरते. पेशानं हेर असलेले टीमचे वडील कार अपघातानंतर अचानक नाहिसे होतात. त्यांचा शोध घेत टीम एका शहरात येतो आणि इथेच त्याची भेट पिकाचूशी होते. हे दोघंही एकत्र येत टीमच्या वडिलांचा शोध घेतात साधरण या कथेवर ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’आधारलेला आहे.