शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पृथ्वीच्या आकाराएवढे आणखी ७ ग्रह सापडल्याचा दावा

पृथ्वीच्या आकाराएवढे आणखी सात ग्रह सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याचीही शक्‍यता आहे. पृथ्वीपासून तब्बल 39 प्रकाशवर्षे अंतरावर आहेत, असे “नेचर’ या खगोलशास्त्र विषयक नियतकालिकामधील एका लेखामध्ये म्हटले आहे. या ग्रहांवर द्रवरुप पाणी आणि कदाचित जीवसृष्टीही अस्तित्वात असावी, असा अंदाज बेल्जियममधील लीज युनिव्हर्सिटीतील संशोधक मायकेल गिलोन यांनी व्यक्‍त केला आहे.
 
खगोल शास्त्रज्ञांना यापूर्वीच सात ग्रहांची मालिका सापडली होती. मात्र पृथ्वीच्या आकाराचे इतके ग्रह पहिल्याचवेळी सापडले आहेत. या ग्रहांच्या भोवतालच्या वातावरणाचे थर जीवसृष्टी अस्तित्वात असण्यासाठी पुरेसे पोषक आहे. हे सर्व ग्रह “ट्रॅप्पिस्ट 1′ नावाच्या छोट्याश्‍या ताऱ्याभोवती फिरत आहेत. आपल्या ग्रहमालेपासून 39 प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेला हा तारा आकाराने गुरु ग्रहापेक्षा थोडासा मोठा आहे. आपल्या सूर्यापेक्षा 2000 पट या ताऱ्याचे तेज कमी आहे.
 
नासाच्या स्पिझर स्पेस टेलिस्कोप या उच्च क्षमतेच्या दुर्बिणीतून सलग 20 दिवस या ग्र्रहांचे निरीक्षण केले गेले. एकच ग्रह वारंवार दिसत असल्याचे आगोदर वाटले होते. मात्र हे ग्रह वेगवेगळे असल्याचे नंतर लक्षात आले.