शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (11:16 IST)

Chaos in Iraq:इराकमध्ये श्रीलंकेसारखी अराजकता, राष्ट्रपती सदनात जमाव शिरला, गोळीबारात 20 ठार

Chaos like Sri Lanka in Iraq
श्रीलंकेनंतर आता इराकमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 10 महिन्यांपासून देशात कोणतेही सरकार नाही आणि शक्तिशाली शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनीही राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. त्याच्यात आणि इराणी समर्थक इराकींमध्ये संघर्ष सुरू झाला. या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 
 
इराकची राजधानी बगदादमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. संतप्त जमावाने श्रीलंकेप्रमाणेच इराकचे राष्ट्रपती भवन आणि सरकारी इमारतींवर कब्जा केला. त्यांना पांगवण्यातही सुरक्षा दल अपयशी ठरले. गर्दीत सहभागी असलेल्या अराजक घटकांनी राष्ट्रपती भवनात बांधलेल्या जलतरण तलावात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे लोक मुक्तदा अल-सद्रचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.