शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (14:47 IST)

रशियात 22 प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उड्डाण करताना बेपत्ता

रशियन हेलिकॉप्टर उड्डाण करताना बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. हेलिकॉप्टर मध्ये क्रू सदस्यांसह एकूण 22 जण होते. हे हेलिकॉप्टर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वृत्तानुसार, रशियाचे Mi-8T हेलिकॉप्टरने शनिवारी रशियाच्या पूर्व भागात असलेल्या कामचटका द्वीपकल्पातून उड्डाण केले. हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेंबर्ससह एकूण 22 जण होते. रशियाच्या फेडरल एअर ट्रॅफिक एजन्सीने सांगितले की हेलिकॉप्टरने वाचकाझेट्स तळावरून उड्डाण केले होते, परंतु हेलिकॉप्टर वेळेवर त्याच्या गंतव्यस्थानावर न पोहोचल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली.

Mi-8T हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे,हेलिकॉप्टरचा शोध घेतला जात आहे. रशियन आपत्कालीन मंत्रालयाचे एमआय-8 हेलिकॉप्टर बचाव पथकांसह शोधासाठी उड्डाण करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे . दरम्यान, वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि हवाई वाहतूक चालवल्याप्रकरणी चौकशी समितीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Edited by - Priya Dixit