1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (11:13 IST)

युक्रेनमधील भयानक दृश्यःबुचा शहरातील सामूहिक कबरीत सापडले 300 हून अधिक मृतदेह

Horrific sightings in Ukraine: More than 300 bodies found in mass graves in the city of Bucha Marathi International News युक्रेनमधील भयानक दृश्यःबुचा शहरातील सामूहिक कबरीत सापडले 300 हून अधिक मृतदेह In Webdunia Marathi
युक्रेनची राजधानी कीव जवळ असलेल्या बुचा शहरातून धक्कादायक चित्रे समोर आली आहेत. यातील एका चित्रात एक भयानक दृश्य दिसत आहे ज्यामध्ये सामूहिक कबरीमध्ये एकूण 280 नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय अनेक लोकांचे मृतदेह विकृत अवस्थेत रस्त्यांवर आढळून आले. रशियन सैनिकांच्या हल्ल्यात ज्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर हा भाग पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आला आहे
 
राज्य आपत्कालीन सेवेने रवाना केलेले बचाव पथक ढिगार्‍यातील वाचलेल्यांचा शोध घेत आहेत .सर्व लोकांचे मृतदेह विकृत अवस्थेत सापडत आहेत. काही इमारतींच्या ढिगाऱ्यात मृतदेह शोधण्याचे कामही सुरू आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. युक्रेनमध्ये मृतांची संख्या वाढतच आहे.
 
युक्रेनच्या इरपिन शहरात 650 स्फोटके सापडली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इरपिनमध्ये रशियन सैन्याने अनेक ठिकाणी बॉम्ब फेकले आहेत. रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यात क्रेमेनचुकमधील युक्रेनची सर्वात मोठी तेल रिफायनरी नष्ट केली. रशिया ल्विव्ह आणि डनिप्रोसह देशभरातील तेल डेपोवर लक्ष्यित हल्ले करत आहे.