1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (19:45 IST)

चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, चालकाचा मृत्यू, सात प्रवासी गंभीर जखमी

a bullet train derailed In China International News In Marathi Webdunia Marathi
दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइझोउ प्रांतात शनिवारी एक वेगवान ट्रेन रुळावरून घसरली, त्यामुळे चालकाचा मृत्यू झाला आणि किमान सात प्रवासी जखमी झाले. चीनच्या नैऋत्य गुईयांग प्रांतातून दक्षिणेकडील ग्वांगझू प्रांतात जाणारी बुलेट ट्रेन D2809 त्यावेळी रोंगजियांग स्टेशनवर अचानक भूस्खलनामुळे रुळावरून घसरली.'ग्लोबल टाइम्स' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, युएझाई बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ट्रेनचे सातवे आणि आठवे डबे रुळावरून घसरले. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. सर्व जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून अन्य 136 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.
 
याआधी मध्य चीनमधील हुनान प्रांतात एक ट्रेन रुळावरून घसरली होती . त्या घटनेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असून 123 जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघाताचे कारण संततधार पाऊस आणि भूस्खलन होते.