1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जेरूसलेम , शुक्रवार, 8 मार्च 2019 (09:38 IST)

चंद्रावरून पहिला सेल्फी पाठवला इस्त्रायली यानाने

Israeli Yane
इस्त्रायलने चंद्रावर पहिले यान पाठवले असून या यानाने मंगळवारी चंद्रावरील पहिला सेल्फी फोटो पाठवला असल्याची माहिती त्या देशाच्या चंद्र मिशनच्या प्रमुखांनी दिली आहे. हे यान पृथ्वीपासून 37 हजार 600 किमी दूर असताना यानाने हा पहिला फोटो पाठवला आहे असे त्यांनी सांगितले. इस्त्रायलच्या या चांद्र मोहीमेच्या यानाने गेल्या 22 फेब्रुवारीला फ्लोरिडाच्या केप कार्निव्हल मधून चंद्राच्या दिशेने प्रयाण केले होते. 585 किलो वजनाच्या या यानाने अमेरिकेच्या फाल्कन 9 या रॅकेटमधून अंतरीक्षातील प्रवास सुरू केला होता.
 
या यानाची ही चांद्र मोहीम सात आठवड्यांची आहे. आत्तापर्यंत केवळ रशिया, चीन आणि अमेरिका या देशांनाच चंद्रावर आपले यान उतरवण्यात यश आले आहे. अमेरिकेने आपला पहिला अंतरराळवीर चंद्रावर उतरवण्याच्या घटनेनंतर 50 वर्षांनी इस्त्रायलला हे यश आले आहे. चंद्राच्या मॅग्नेटीक फिल्डचा अभ्यास हे यान करणार आहे. चंद्राच्या पृष्ठ भागावर इस्त्रायलची ओळख सांगणाऱ्या काहीं वस्तु आणि ध्वजही तेथे प्रस्थापित केला जाणार आहे. पुढील वर्षी जपान आपले यान चंद्रावर पाठवणार आहे.