1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (22:13 IST)

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले

Japan declared corona emergency
जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे. करोनाच्या नव्या रुग्णांचं प्रमाण घटल्याने देशातील करोना आणीबाणी आता संपवण्यात आली आहे असं शिंजो आबे यांनी म्हटलं आहे. 
 
आम्ही ही आणीबाणी उठवण्यासाठी एक विशिष्ट धोरण आखलं होतं. आमच्या देशात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आता देशभरात आणीबाणीची गरज नाही म्हणून ही आणीबाणी आम्ही देशपातळीवर उठवत आहोत असंही आबे यांनी म्हटलं आहे.