शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पत्नीला पतीची ऍलर्जी

वॉशिंग्टन- विचार करा एखाद्या पत्नीला जर आपल्या पतीची ऍलर्जी असेल तर? ऐकण्यात विनोद वाटत असला तरी हे खरं आहे. अमेरिकेतील एक महिला मास्ट सेल अॅक्टिवेशन सिंड्रोम याने पीडित आहे. या आजारामुळे तिला अनेक वस्तूंची ऍलर्जी आहे ज्यात तिचा पतीही सामील आहे.
अमेरिकेत राहणारी 29 वर्षीय जोहान वॉटकिन्स मागल्या एक वर्षापासून आपल्या खोलीतून बाहेरच पडत नाहीये. कारण तिला डस्ट, जेवण, केमिकल्स आणि अनेक वस्तूंची ऍलर्जी आहे. जोहानाच्या पतीने तिच्यासाठी सेफ झोन बनवले आहे जिथल्या खिडक्या बंद राहतात, त्या खोलीत ऊन येत नाही आणि खोली प्लास्टिकने कव्हर केलेली आहे.
 
सर्वात मोठा त्रास म्हणजे जोहानला मानवी शरीराची गंधही सहन होत नाहीये आणि याच कारणामुळे ती आपल्या पतीसोबतही राहू शकत नाही. पत्नीला त्रास नको म्हणून तिचा पती दुसर्‍या खोलीत राहतो.
 
सौजन्य: सोशल मीडिया